January 25, 2025 3:30 PM

printer

बेकायदेशीररित्या रहात असलेल्या पाच बांगलादेशींना ठाण्यातून ताब्यात

ठाणे जिल्ह्यात कल्याण इथं बेकायदेशीररित्या रहात असलेल्या पाच बांगलादेशी नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पोलीस या संदर्भात अधिक तपास करत आहेत. गांधीनगर झोपडपट्टीतून या नागरिकांना ताब्यात घेतल्याचं पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितलं. यामध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे.