बांग्लादेशाची राजधानी ढाकामध्ये आज आंदोलनकारी शिक्षक आणि पोलिसांमध्ये झालेल्या हिंसाचारात १२० जण जखमी झाले. वेतन आणि पदोन्नती प्रक्रियेत मोठ्या बदलांची मागणी करत प्राथमिक शिक्षकांनी उद्यापासून कामबंद आंदोलन पुकारलं आहे. कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतल्यानंतर शिक्षकांनी काढलेला मोर्चा पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. काही आंदोलकांनी बॅरिकेड्स तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पोलिसांवर दगडफेक केली, त्यानंतर परिस्थिती चिघळली.
Site Admin | November 8, 2025 8:12 PM | Bangladesh Violence
Bangladesh: ढाकामध्ये हिंसाचारात १२० जण जखमी