‘बांगलादेशात अवामी लीगशिवाय होणारी निवडणूक ही राज्याभिषेक असेल’

बांगलादेशात अवामी लीगशिवाय होणारी निवडणूक ही निवडणूक नसून राज्याभिषेक असेल असं बांगलादेशाच्या पदच्युत प्रधानमंत्री शेख हसीना म्हणाल्या आहेत. एका वृत्त संस्थेला त्या मुलाखत देत होत्या.  मोहम्मद युनुस हे बांगलादेशी नागरिकांच्या पाठिंब्याशिवाय तिथे सत्ता गाजवत असून, आता ते जनतेनं नऊ वेळा निवडून दिलेल्या पक्षावर बंदी घालण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका शेख हसीना यांनी केली. भारत हा बांगलादेशाचा सर्वात घनिष्ट मित्र आणि भागीदार आहे. मात्र, मोहम्मद युनूस हे बांगलादेशात भारताच्या विरोधात लोकभावना भडकवत आहेत. भारताला बांगलादेशातल्या आपल्या राजनैतिक अधिकाऱ्यांविषयी वाटणारी चिंता योग्य आहे, असं शेख हसीना म्हणाल्या. 

 

बांगलादेशात पुढच्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होणार असून त्यात अवामी लीग पक्षाला निवडणूक लढवायला बंदी घालण्यात आली आहे.