बांग्लादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांना आज ढाक्याच्या एका न्यायालयाने भूखंड घोटाळा प्रकरणी दोषी ठरवून २१ वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली आहे. त्याच आरोपाखाली हसीना यांच्या दोन्ही मुलांना प्रत्येकी ५ वर्षांची, तर त्यांच्या २० मंत्र्यांना निरनिराळ्या कालावधीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याआधी १७ नोव्हेंबर रोजी बांग्लादेशच्या एका विशेष फौजदारी न्यायाधिकरणाने शेख हसीना आणि तत्कालीन गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल यांना मानवताविरोधी गुन्ह्यांखाली मृत्युदंडाची शिक्षा दिली होती. शेख हसीना यांनी सध्या भारतात आश्रय घेतला आहे. तसंच कमाल हेदेखील भारतातच लपून असल्याचं म्हटलं जात आहे.
Site Admin | November 27, 2025 8:20 PM | Bangladesh Shaikh Hasina
शेख हसीना यांना भूखंड घोटाळा प्रकरणी २१ वर्षांच्या कारावासाची शिक्षा