डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बांगलादेशमध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा १११वा वर्धापन दिन साजरा

बांगलादेशामध्ये भारतीय चित्रपटसृष्टीचा १११ वा वर्धापनदिन राजधानी ढाका इथं साजरा करण्यात आला. भारतीय संस्कृती केंद्र, ढाका इथं ‘भारतीय सिनेमाचा प्रवास’ या विषयावरील समृद्ध आणि माहितीपूर्ण प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे. ढाका इथल्या भारतीय उच्चायुक्त इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र आणि भारतीय उच्चायुक्तालयाने आयोजित केलेल्या या प्रदर्शनाचं उद्घाटन बांगलादेशातील भारताचे उच्चायुक्त प्रणय वर्मा यांच्या हस्ते झालं. भारतीय चित्रपटसृष्टीची सुरुवात २१ मे १९१३ रोजी राजा हरिश्चंद्र या मूकपटाच्या प्रदर्शनाने झाली. म्हणून २०२५ हे भारतीय चित्रपटसृष्टीच्या स्थापनेचं १११ वं वर्ष आहे, असं वर्मा यांनी नमूद केलं.