डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

बांगलादेशातून आयात होणाऱ्या मालावर नवे निर्बंध

बांगलादेशातून आयात होणाऱ्या काही वस्तूंसाठी परदेश व्यापार महासंचालनालयानं नवीन निर्बंध घातले आहेत. बांगलादेशातून सर्व प्रकारच्या तयार कपड्यांच्या आयातीला भूपृष्ठ-मार्गे बंदी असेल, पण न्हावा शेवा आणि कोलकाता या सागरी बंदरांमधून या वस्तूंच्या आयातीला परवानगी असेल. त्याशिवाय, फळं, फळांच्या स्वादाची आणि कार्बोनेटेड पेयं, प्रक्रियाकृत  अन्नपदार्थ, कापूस आणि कापसाच्या धाग्याचा कचरा, रंगद्रव्य, प्लास्टिसायझर्स आणि देशांतर्गत उद्योगांसाठी वापरले जाणारे ग्रॅन्युल वगळता, प्लास्टिक आणि पीव्हीसीच्या तयार वस्तू आणि लाकडी फर्निचरच्या आयातीवर बंदी असेल. मासे, एलपीजी, खाद्यतेल आणि क्रश्ड स्टोन च्या आयातीवर मात्र हे निर्बंध लागू नाहीत.

 

आसाम, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, आणि पश्चिम बंगालमधलं चांगराबंधा आणि फुलबारी इथल्या लँड कस्टम स्टेशन अथवा  इंटिग्रेटेड चेक पोस्ट  द्वारे या वस्तूंची ने-आण करायला बंदी असेल. 

 

बांगलादेशातून भारतमार्गे नेपाळ आणि भूतान इथं जाणाऱ्या वस्तूंवर हे निर्बंध लागू होणार नाहीत. असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं अधिसूचनेत स्पष्ट केलं आहे . हे निर्देश तात्काळ लागू झाले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा