बांगलादेशात सार्वत्रिक निवडणूक वेळेवर घेतली नाही तर देशासमोर गंभीर आव्हानं उभी राहू शकतात, असा इशारा सेंटर फॉर पॉलीसी डायलॉग या संस्थेनं दिला आहे. निवडणुका घ्यायला उशीर झाला तर गुंतवणूकदारांवर त्याचा परिणाम होऊ शकतो, असं सीपीडीचे प्राध्यापक मुस्तफिजुर रेहमान यांनी म्हटलं आहे. गुंतवणूक येण्यासाठी राजकीय स्थैर्य महत्वाचं असतं, नुकत्याच झालेल्या गुंतवणूक परिषदेमुळे थोडीशी आशा निर्माण झाली असली तरी प्रत्यक्ष गुंतवणूक फारशी झाली नाही, असं रेहमान म्हणाले. यावेळी रेहमान यांनी गुंतवणुकीच्या दृष्टीनं बांगलादेश आणि व्हिएतनाम यांची तुलना केली. व्हिएतनाममधे ३६० दशलक्ष डॉलरची गुंतवणूक झाली तर बांगलादेशात २२ दशलक्ष डॉलरची तुलना झाली असं त्यांनी सांगितलं.
Site Admin | April 27, 2025 6:43 PM | Bangladesh Elections
बांगलादेशात सार्वत्रिक निवडणूक वेळेवर न घेतल्यास देशासमोर गंभीर आव्हान-CPD
