August 6, 2024 7:03 PM

printer

बांगलादेशातल्या भारतीय नागरिकांशी सातत्यानं संपर्कात असल्याची केंद्र सरकारतर्फे संसदेत ग्वाही

बांगलादेशात निर्माण झालेलं अस्थिर आणि अशांत वातावरणाच्या पार्श्वभूमीवर तिथं असलेल्या भारतीय नागरिकांशी केंद्र सरकार राजनैतिक उपक्रमांच्या माध्यमातून सातत्यानं संपर्कात असल्याची माहिती परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी लोकसभा आणि राज्यसभेत दिली. बांगलादेशात निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत जयशंकर यांनी दोन्ही सभागृहात आज निवेदन दिलं. सध्या बांगलादेशात १९ हजार भारतीय नागरिक असून त्यात नऊ हजार विद्यार्थी असल्याचंही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर भारतात येण्यासाठी परवानगी मागितली होती. काल संध्याकाळी त्या दिल्लीत दाखल झाल्याचं जयशंकर यांनी सांगितलं. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.