डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

Bangladesh : इस्कॉन समूहाचे नेते चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना अटकेत ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश

बांगलादेशात इस्कॉन समूहाचे नेते चिन्मय कृष्णदास ब्रह्मचारी यांना मनुष्यहत्येच्या आरोपाखाली अटकेत ठेवावं असं चितगांव न्यायालयानं सांगितलं. चिन्मय कृष्णदास यांनी सम्मीलितो सनातनी जागरण जोते या संघटनेच्या जाहीर कार्यक्रमात राष्ट्रीय ध्वजापेक्षा अधिक उंचावर धार्मिक ध्वज फडकावल्याबद्दल, देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना गेल्या २५ नोव्हेंबरला अटक झाली. त्याने संतप्त झालेल्या त्यांच्या अनुयायांनी केलेल्या  हिंसाचारात वकील सैफुल इस्लाम आलिफ यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. त्यांच्या हत्येला कारणीभूत ठरल्याचा आरोप  चिन्मय कृष्णदास यांच्यावर ठेवावा असं न्यायालयानं सांगितलं.