बांग्लादेश सरकार कडेकोट बंदोबस्तात विद्यार्थी नेता शरीफ ओस्मान हैदीवर अंत्यसंस्कार करणार आहे. संसदेच्या इमारतीत दुपारी अंतिम नमाज अदा केली जाईल, असं सरकारनं कळवलं आहे. त्याच्या निधनानिमित्त सरकारनं एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. इन्किलाब मंच या संघटनेचा प्रवक्ता असलेल्या हैदीवर १२ तारखेला ढाक्यात गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. उपचारादरम्यान सिंगापूरमध्ये त्यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं होतं. त्यानंतर बांग्लादेशमध्ये हिंसाचार उफाळून आला होता. प्रधानमंत्री शेख हसीना यांचं सरकार उलथवून टाकण्यात त्याची महत्त्वाची भूमिका होती आणि फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या निवडणुका तो लढवणार होता.
दरम्यान, एका अल्पसंख्य व्यक्तीची हत्या केल्याप्रकरणी बांग्लादेशाच्या शीघ्र कृती दलानं ७ जणांना अटक केली आहे. ईश निंदेचा आरोप करुन गुरुवारी या व्यक्तीची हत्या झाली होती.