December 19, 2025 8:23 PM | Bangladesh

printer

बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराचा प्रतिकार करण्याचं हंगामी सरकारचं आवाहन

बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराचा प्रतिकार करण्याचं आवाहन तिथल्या हंगामी सरकारनं नागरिकांना केलं आहे. बांगलादेशात जुलैमधे झालेल्या बंडाचा एक प्रमुख नेता शरीफ ओस्मान हादी हा काही दिवसांपूर्वी गोळीबारात जखमी झाला. सिंगापूरमधे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह ढाक्यात पोचल्यावर काल रात्री विविध भागात तोडफोड आणि हल्ले सुरु झाले. चत्तोग्राममधे भारताच्या सहायक उच्चायुक्तांच्या घरावरही दगडफेक झाली. आज मात्र कुठंही नव्यानं हिंसाचार घडल्याचं वृत्त नाही.