November 20, 2025 1:45 PM

printer

बांगलादेशात पुन्हा एकदा काळजीवाहू सरकार प्रणाली लागू करण्याचा निर्णय

बांगलादेशात पुन्हा एकदा काळजीवाहू सरकार प्रणाली लागू करण्याचा निर्णय तिथल्या सर्वोच्च न्यायालयाच्या अपिलीय विभागाने दिला आहे. १४ व्या सार्वत्रिक निवडणुकीपासून काळजीवाहू सरकार प्रणाली लागू होईल.

 

१० मे २०११ ला सर्वोच्च न्यायालयाने काळजीवाहू सरकार प्रणाली बंद केली होती. या निर्णयाचा येणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीवर काहीही परिणाम होणार नाही असं न्यायालायनं सांगितलं. याआधी १९९६, १००१ आणि २००८ मधे काळजीवाहू सरकार असतानाच निवडणूका झाल्या होत्या.