तागापासून निर्मित काही उत्पादनं आणि दोर यांची बांग्लादेशातून रस्ते वाहतुकीद्वारे आयात करण्यावर भारतानं बंदी घातली आहे. ही बंदी तत्काळ प्रभावानं लागू असेल. या वस्तूंची आयात केवळ महाराष्ट्रातल्या न्हावाशेवा बंदरातूनच करता येईल. भारत बांग्लादेश सीमेवरील कोणत्याही बंदरातून आयातीला परवानगी दिली जाणार नाही, असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे.
Site Admin | August 13, 2025 10:32 AM | bangladesh inda
तागापासून निर्मित काही उत्पादनांची बांग्लादेशातून रस्ते वाहतुकीद्वारे आयात करण्यावर भारताची बंदी