डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

August 23, 2024 3:15 PM | drug | medicine

printer

शरीरावर विपरीत परिणाम करणाऱ्या १५६ औषधांवर बंदी

शरीरावर विपरीत परिणाम करणाऱ्या १५६ औषधांवर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. यात प्रतिजैविकं, वेदनाशामक आणि जीवनसत्वांच्या औषधांचा समावेश आहे. बंदी घातलेल्या १५६ औषधांमध्ये काही अनुचित मिश्रण असल्याचं निदर्शनास आलं असून  यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिसूचनेत म्हटलं आहे.  

सरकार आणि औषध तांत्रिक सल्लागार मंडळ-DTAB यांच्या विशेष समितीनं केलेल्या तपासणीनंतर हा निर्णय घेतल्याचंही अधिसूचनेत म्हटलं आहे. या समितीनं केलेल्या तपासात ही औषधे रुग्णासाठी अपायकारक असल्याचं आढळून आल्याचंही म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.