December 6, 2025 9:30 AM

printer

बालविवाहमुक्त भारतासाठी 100 दिवसांची जागरुकता मोहीम सुरू

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या वतीनं बालविवाहमुक्त भारतासाठी 100 दिवसांची जागरुकता मोहीम नुकतीच सुरू झाली आहे. या अंतर्गत पुण्यात होत असलेल्या उपक्रमाबद्दल अधिक माहिती आमच्या प्रतिनिधिकडून….

बाल विवाह मुक्त भारत अभियानाची सुरुवात पुणे जिल्ह्यातही झाली असून पुरंदर तालुक्यात 25 गावांमध्ये हे अभियान राबवलं जात आहे. यात ग्रामपंचायत आणि शाळांच्या मदतीने जनजागृती केली जात आहे. या अभियानामध्ये पथनाट्य, पदफेरी, चर्चासत्रे, पॉपेट शो, लघुपट यांच्या माध्यमातून बालविवाहाचे दुष्परिणाम लोकांपर्यंत पोहोचवले जाणार आहेत. ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, पोलीस यांसारख्या स्थानिक घटकांना एकत्र आणून अभियान राबवण्यात येणार आहेत. त्यात सामान्य नागरिकांनाही सहभागी होता येणार आहे. केंद्र सरकारने 2030 पर्यंत बालविवाह निर्मूलनाचे उद्दिष्ट समोर ठेवून हे अभियान सुरू केलं असून या अभियानात सहभागी होण्यासाठी संबंधित जिल्हा महिला आणि बाल विकास विभाग किंवा बाल संरक्षण कक्ष यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन प्रशासनाने केलं आहे.