October 20, 2025 12:48 PM | Balochistan | Pakistan

printer

दोन विद्यार्थ्यांसह किमान १८ बलोचिस्तानी नागरिक पाकिस्तानच्या ताब्यात

बलुचिस्तानच्या विविध जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाईदरम्यान पाकिस्ताननं दोन विद्यार्थ्यांसह किमान १८ बलोचिस्तानी नागरिकांना ताब्यात घेऊन अज्ञात ठिकाणी नेल्याची माहिती आहे. कालही पाकिस्तानच्या सशस्त्र दलांनी बलुचिस्तानच्या विविध भागांतून आठ नागरिकांना ताब्यात घेतलं. अशा प्रकारे नागरिकांना गायब करणं हे कायदेशीर आणि नैतिक मूल्यांचं स्पष्ट उल्लंघन आहे, अशी टीका पाकिस्तान मानवाधिकार आयोग आणि इतर संघटनांनी केली आहे. बलुचिस्तानात अशा घटना घडत राहिल्या, तर तिथली परिस्थिती अस्थिर होईल, असा इशारा आयोगानं ताज्या अहवालांमध्ये दिला आहे.