राष्ट्रीय बालिका दिवस आज देशभरात साजरा केला जात आहे. मुलींचे अधिकार, आरोग्य, पोषण आणि कल्याण अबाधित राखत लैंगिक समानता, समान अधिकार तसंच मुलींची सक्षम नागरिक म्हणून ओळख निर्माण होण्यासाठी अनुकूल वातावरण तयार व्हायला प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं दरवर्षी २४ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २२ जानेवारी २०१५ रोजी सुरु केलेल्या ‘बेटी बचाओ- बेटी पढाओ’ योजनेचा वर्धापन दिन म्हणूनही हा दिवस देशभर साजरा केला जात आहे. महिला आणि बालविकास मंत्रालयाच्या पुढाकारानं २००८ मध्ये पहिल्यांदा हा दिवस साजरा केला होता.
Site Admin | January 24, 2026 3:16 PM | balika divas
राष्ट्रीय बालिका दिवस आज देशभरात साजरा