लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी लोकमान्य टिळकांना आदरांजली वाहिली आहे. लोकमान्यांनी केलेल्या जनजागृतीच्या कार्याचा गौरव त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमधे केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनीही लोकमान्य टिळकांना आदराजंली वाहिली आहे.
टिळक पुण्यतिथीनिमित्त आज रत्नागिरीत टिळक आळी इथं त्यांच्या जन्मस्थळी त्यांना अभिवादन करण्यात आलं. जिल्हाधिकारी आणि जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यावेळी उपस्थित होते. लोकमान्यांच्या जन्मघरात त्यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आणि वस्तू असून, मान्यवरांनी त्याची पाहणी केली.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज लोकमान्य टिळक ट्रस्टचा राष्ट्रीय पुरस्कार पुण्यात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिला जात आहे. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि इतर मान्यवर उपस्थित आहेत.