कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

आगामी हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि विनेश फोगाट यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि दीपक बवरिया यावेळी उपस्थित होते. काँग्रेस पक्षाची भूमिका महिलांसोबत उभं राहण्याची आणि कठीण काळात त्यांना साथ देण्याची असल्यानं पक्षात प्रवेश करत असल्याचं विनेश फोगाट हिनं यावेळी बोलताना सांगितलं.