राज्यात बैलपोळ्याचा सण कालपासून मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. अकोला जिल्ह्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात आज पारंपरिक पद्धतीनं बैलपोळा साजरा झाला. विद्यापीठाचे अधिष्ठाता, प्राध्यापक, कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.
भंडारा जिल्ह्याच्या लाखनी शहरात आज ‘मारबात’ उत्सव साजरा झाला. बैलपोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ही मिरवणूक काढण्याची प्रथा आहे. ‘वाईटाचा नाश आणि चांगल्याचा विजय’ असा संदेश देणाऱ्या या मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषेत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.