बविआ पालघर जिल्ह्यातल्या ६ विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढणार

बहुजन विकास आघाडी पालघर जिल्ह्यातल्या सर्व सहा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढणार असल्याची घोषणा पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकुर यांनी केली आहे. विरार पश्चिम इथं बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांच्या मेळावा काल आयोजित केला होता, यात ठाकुर यांनी विधानसभा निवडणुकीत पक्षाला विजय मिळेल असा विश्वास व्यक्त केला.