चीनमध्ये चेंगडू इथं झालेल्या बॅडमिंटन एशिया अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं मुलींच्या कनिष्ठ गटात एकेरीमधली दोन सुवर्णपदकं, आणि एक रौप्य पदक पटकावलं.
१५ वर्षांखालच्या गटात शायना मणिमुथू हीनं जपानच्या चिहारू टोमिता हिला २१-१४, २२-२० असं नमवलं.
१७ वर्षांखालच्या गटात दीक्षा सुधाकर हीनं अंतिम फेरीत भारताच्याच लक्ष्या राजेश हिला २१-१६, २१-९ असं हरवून सुवर्णपदक जिंकलं, तर लक्ष्या हिला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
बॅडमिंटन एशियामधली ही या दोन्ही वयोगटांमधली भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे.