November 3, 2024 1:27 PM | Badminton

printer

भारताची बॅडमिंटनपटू मालविका बनसोडची हायलो ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

भारताची बॅडमिंटनपटू मालविका बनसोड हिनं हायलो ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत तिनं डेन्मार्कच्या प्रतिस्पर्ध्याचा २३-२१, २१-१८ असा थेट गेम्समध्ये पराभव केला. तिचा अंतिम फेरीचा सामना आज रात्री डेन्मार्कच्याच, सातव्या मानांकित मिया ब्लिचफेल्ड हिच्याशी होणार आहे.