अबू धाबी इथं सुरू असलेल्या अल ऐन मास्टर्स २०२५ बॅडमिंटन स्पर्धेत भारताची उदयोन्मुख महिला बॅडमिंटनपटू श्रियान्शी वलिशेट्टी हिनं महिला एकेरीचं, तर हरिहरन अम्साकरुणन आणि अर्जुन मादथिल रामचंद्रन जोडीनं, पुरुष दुहेरीचं विजेतेपद पटकावलं आहे. अंतिम फेरीत श्रियान्शीनं भारताच्याच तसनीम हिचा १५-२१, २२-२०,२२-२० असा ३ गेम्समध्ये पराभव केला.
तर, पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत हरिहरन अम्साकरुणन आणि अर्जुन मादथिल रामचंद्रन जोडीनं इंडोनेशियाच्या रेमंड इंद्रा आणि निकोलस जोक्विन जोडीला, २१-१७, २१-१८ असं हरवलं.