December 28, 2025 8:09 PM | Badminton Tournament

printer

८७ व्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत ऋत्विक संजीव एस. यानं पटकावलं पुरुष एकेरीचं जेतेपद

विजयवाडा इथं झालेल्या . त्यानं अंतिम सामन्यात भारत राघव याचा २१-१६, २२-२० अशा थेट गेम्समध्ये पराभव केला. पुरुष दुहेरीत ए. हरिहरन आणि रुबन कुमार या जोडीनं मिथिलेश कृष्णन आणि प्रेजन यांचा २४-२२, २१-१७ असा पराभव करून विजेतेपद पटकावलं. 

महिला दुहेरीच्या अंतिम सामन्यात माजी विजेत्या शिखा गौतम आणि अश्विनी भट के. या जोडीनं प्रिया देवी कोंजेनबम आणि श्रुती मिश्रा या जोडीचा पराभव करून पुन्हा एकदा जेतेपद आपल्या नावे केलं आहे. 

मिश्र दुहेरीत सात्विक रेड्डी के. आणि राधिका शर्मा यांनी विजेतेपद पटकावलं. या जोडीनं अंतिम सामन्यात अशिथ सूर्या आणि अमृता पी. या जोडीचा २१-९, २१-१५ असा पराभव केला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.