पॅरिसमध्ये सुरु बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी आणि ऑलिंपिक पदक विजेती पीव्ही सिंधू यांनी काल अंतिम १६ मध्ये स्थान मिळवलं. सात्विक आणि चिराग या भारतीय जोडीने चिनी तैपेईच्या लिऊ कुआंग हेंग आणि यांग पो हान यांचा पराभव केला.
महिला एकेरीत पीव्ही सिंधूने मलेशियाच्या करुपथेवन लेत्शाना हिचा पराभव केला. मिश्र दुहेरीत, भारताच्या ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांनी आयर्लंडच्या जोशुआ मॅगी आणि मोया रायन यांचा पराभव करून शेवटच्या १६ मध्ये प्रवेश केला.