जपानच्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताने चांगली सुरुवात केली. टोकियो इथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विकसाईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी तर एकेरी गटात लक्ष्य सेन यांनी दमदार कामगिरी करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.
सात्विक साईराज आणि चिराग या जोडीनं दक्षिण कोरियाच्या कांग मिन हुक आणि किम डाँग यांचा पराभव करत शुभारंभाच्या सामन्यात जागतिक पातळीवरचं १५ वं स्थान पटकावलं. लक्ष्य सेन याने देखील चीनच्या वांग झेन्ग झिंग याचा पराभव केला.
मात्र, दोन वेळा ऑलिम्पिक पदक मिळवलेल्या पीव्ही सिंधू हिला पराभवाला सामोरं जावं लागलं.