April 10, 2025 1:46 PM | Badminton

printer

आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

चीनमध्ये निंगबो इथं सुरु असलेल्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताची मिश्र जोडी ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी चीनी तैपेच्या हाँग वेई ये आणि निकोल गोंझालेस चान यांचा १२-२१, २१-१६, २१-१८ असा पराभव केला. तसंच आशिथ सूर्या आणि अमृता प्रमुथेश या जोडीचा उपउपांत्यपूर्व फेरीत पराभव झाला. 

 

महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत पी.व्ही. सिंधूला जपानच्या अकाने यामागुची कडून ११-२१, २१-१६, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला. पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या किरण जॉर्जला देखील थायलंडच्या कुनलावुत विटिडसारनकडून २१-१९, १३-२१, १६-२१ असा पराभव पत्करावा लागला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.