March 12, 2025 3:35 PM | Badminton

printer

ऑल इंग्लंड खुली बॅडमिंटन स्पर्धा : भारताच्या लक्ष्य सेन आणि मालविका बनसोड यांचा उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

बर्मिंगहम इथं सुरू असलेल्या ऑल इंग्लंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेन आणि मालविका बनसोड यांनी उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे.  पुरूष एकेरीत एचएस प्रणॉयला आणि मिश्र दुहेरीत सतीश करुणाकरन आणि आद्या वरियथ या जोडीला पराभव पत्करावा लागला.

 

महिला दुहेरीत तनिषा क्रॅस्टो आणि अश्विनी पोनप्पा जोडीचा मुकाबला हसीह पेई-शान आणि हंग एन-त्झू यांच्याशी होणार आहे. तसंच पीव्ही सिंधू महिला एकेरीचा सामना खेळेल तर सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी पुरुष दुहेरीत खेळणार आहेत. महिला दुहेरीत ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांच्या जोडीसह प्रिया कोंजेंगबम आणि श्रुती मिश्रा देखील उद्या खेळतील.

 

शिवाय, रोहन कपूर आणि रुत्विका गड्डे आणि ध्रुव कपिला आणि तनिषा क्रॅस्टो या जोड्या मिश्र दुहेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.