January 15, 2025 8:21 PM | Badminton

printer

बॅडमिंटन : महिला एकेरीत भारताच्या अनुपमा उपाध्याय हिचा उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी प्रकारात भारताच्या अनुपमा उपाध्याय हिने उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने पहिल्या फेरीत भारताच्याच रक्षिता रामराज हिचा २१-१७, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला. भारताच्या मालविका बनसोड आणि आकर्शी कश्यप तर पुरुष एकेरीत भारताचे प्रियांशू राजावत आणि एच. एस. प्रणॉय यांचं आव्हान संपुष्टात आलं आहे.