डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 21, 2024 8:13 PM | Badminton

printer

चायना मास्टर्स २०२४ बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेत लक्ष्य सेनेचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

चायना मास्टर्स २०२४ बॅडमिंटन क्रीडा स्पर्धेमध्ये  पुरुष एकेरीत लक्ष्य सेनेनं  डेन्मार्कच्या रासमुस गेमकेचा २१-१६,२१-१८ असा पराभव करत पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तर पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज रँकिरेड्डी या भारतीय जोडीनं डेन्मार्कच्या जोडीचा २१- १९, २१ -१५ असा पराभव  करत उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. 

 

आज दुपारी महिला दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत ट्रेस जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय जोडीला चीनच्या खेळाडूंकडून पराभवाचा सामना करावा लागला.