तुषार आपटेचा ‘स्वीकृत’ नगरसेवक पदाचा राजीनामा

भारतीय जनता पक्षानं बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातला सह-आरोपी तुषार आपटे यांनी ठाणे जिल्ह्यातल्या कुळगाव-बदलापूर नगरपरिषदेतल्या ‘स्वीकृत’ नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. काल त्याची स्वीकृत नगरसेवक म्हणून नियुक्ती झाली होती. त्यानंतर विरोधकांनी त्याच्यावर टीका केली होती. 

 

भाजपाचा हा निर्णय दुर्दैवी असल्याचं मत मुंबई काँग्रेस समितीच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी आज मांडलं. तर, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या सह-आरोपीला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देऊन भाजपानं असंवेदनशीलतेचा कळस गाठला असून, आपलं प्राधान्य कशाला आहे, हे दाखवून दिल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी केली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनीही या निर्णयावरून भाजपावर निशाणा साधला आहे. कुटुंबातल्या मुली सुरक्षित ठेवायच्या असतील तर भाजपला मतदान करू नका, असं आवाहन वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी याप्रकरणावरुन केलं आहे. 

 

बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणाची तक्रार दाखल न केल्याबद्दल संबंधित शाळा व्यवस्थापनाविरोधात गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर ४४ दिवसांनी संस्थेचा तत्कालीन सचिव आपटे यांना अटक करण्यात आली, आणि ४८ तासांत त्यांना जमीन मंजूर झाला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.