बदलापूर इथं अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ही अत्यंत निंदनीय – राहुल गांधी

बदलापूर इथं अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचाराची घटना ही अत्यंत निंदनीय आहे.  पश्चिम बंगाल, युपी, बिहारनंतर महाराष्ट्रातील मुली देखील आता सुरक्षित राहिलेल्या नाहीत. समाज म्हणून आपली वाटचाल कुठं होत आहे, अशी प्रतिक्रिया लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी समाजमाध्यमावर व्यक्त केली आहे. 

अल्पवयीन मुलींवर झालेल्या अन्यायाला दाद मिळवण्यासाठी  जनआंदोलन उभारावं लागलं. एफआयआर नोंदवण्यासाठी आंदोलन का करावं लागतं, असा प्रश्न ही राहुल गांधी यांनी उपस्थित केला. या घटनेनंतर महिलांना सुरक्षित वातावरण देण्यासाठी काय करायला हवं, याचा विचार सरकार तसंच राजकीय पक्षांनी गंभीरपणं करायला हवा,असंही त्यांनी नमूद केलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.