शिशुवर्गांवर सरकारचं नियंत्रण आणण्याबाबत सरकार गांभीर्यानं विचार करत असून यासंदर्भातल्या कायद्याचा मसुदा अभ्यास गट तयार करत आहे, अशी माहिती शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलताना दिली. बदलापूर इथं शिशुवर्गातल्या विद्यार्थिनीशी गैरवर्तणूक केल्याप्रकरणी चालक आणि शाळेच्या वाहनावर कारवाई केल्याचंही त्यांनी सांगितलं.