डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 4, 2025 1:53 PM | Baba Sivanand

printer

योगसाधक बाबा शिवानंद यांचं निधन

आध्यात्मिक गुरु आणि योगसाधक बाबा शिवानंद यांचं काल रात्री निधन झालं. ते १२८ वर्षांचे होते. बाबा शिवानंद यांनी योगसाधनेद्वारे केलेल्या समाजसेवेबद्दल त्यांना २०२२ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आलं होत. प्रकृती खालावल्यामुळे बाबा शिवानंद यांना ३० एप्रिल रोजी वाराणसी इथल्या बनारस हिंदू विद्यापीठाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होत. तिथेच त्यांनी काल रात्री अखेरचा श्वास घेतला.

 

बाबा शिवानंदांचा जन्म आताच्या बांग्लादेशमधल्या सिल्हेट जिल्ह्यात १८९६ साली झाला होता, वयाच्या सहाव्या वर्षी आईवडिलांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना ओंकारानंद यांनी आपल्या छत्रछायेखाली घेतलं आणि पुढे अध्यात्म आणि योगसाधनेची दीक्षा दिली होती.  

 

बाबा शिवानंदांच्या निधनाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. ‘योग आणि साधनेला समर्पित असलेल्या त्यांच्या जीवनातून देशातील अनेक पिढ्यांना प्रेरणा मिळत राहील’, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या एक्स वर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे. 

 

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही बाबांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. बाबांनी योगसाधनेप्रति दिलेलं योगदान अतुलनीय असल्याचं त्यांनी आपल्या एक्स वर लिहिलेल्या संदेशात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.