December 25, 2025 2:35 PM | pradhanmantri baal din

printer

प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ नवी दिल्लीत प्रदान करण्यात येणार

वीर बाल दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या नवी दिल्लीत ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारासाठी यंदा १८ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमधल्या २० मुलांची निवड करण्यात आली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या कार्यक्रमात उपस्थित मुलांना तसंच तरुणांना संबोधित करतील.