जेष्ठ अभिनेते दिग्दर्शक बाळ कर्वे यांचं आज सकाळी मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. चिमणराव मालिकेत त्यांनी वठवलेली गुंड्याभाऊंची भूमिका अद्याप रसिकांच्या स्मरणात आहे.
बन्या बापू, लपंडाव, सुंदरा सातारकर, चटक चांदणी अशा चित्रपटांमधून तर रथचक्र, तांदूळ निवडता निवडता, आई रिटायर होते, कुसुम मनोहर लेले, शांतता कोर्ट चालू आहे, सूर्याची पिल्ले अशा नाटकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सई परांजपे दिग्दर्शित कथा या हिंदी सिनेमातही कर्वे यांनी काम केलं होतं.