दाक्षिणात्य चित्रपट अभिनेत्री बी सरोजा यांचं आज बंगळुरुमध्ये निधन झालं. त्या ८७ वर्षांच्या होत्या. अभिनय सरस्वती म्हणून प्रसिद्ध असलेल्या सरोजा यांनी १९५५ मध्ये महाकवी कालिदास चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं. सात दशकांहून अधिक काळ त्यांनी कन्नड, तमिळ, तेलगू आणि हिंदी भाषेतल्या २०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं.
ब्रिटिशांशी लढणाऱ्या कित्तूरच्या शूर राणी चेन्नम्माची भूमिका साकारून त्यांनी कन्नड चित्रपट रसिकांची मने जिंकली. भारतीय चित्रपटसृष्टीतील त्यांच्या मौल्यवान योगदानाबद्दल सरोजा देवी यांना पद्मश्री आणि पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
दिग्गज अभिनेते डॉ. राजकुमार आणि कल्याण कुमार यांच्यासोबतच्या त्यांनी काम केलं आहे. त्यांनी राजेंद्र कुमार आणि शम्मी कपूर यांच्यासोबत आशा, घराना आणि मेहेंदी लगा के रखना या हिंदी चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका केल्या आहेत.