डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

आयुष्मान भारत ही सर्वोत्तम सामाजिक सुरक्षा योजनांपैकी एक योजना – अर्थमंत्री

आयुष्मान भारत ही सर्वोत्तम सामाजिक सुरक्षा योजनांपैकी एक योजना आहे, असं प्रतिपादन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. अमेरिकेतल्या पेनसिल्वेनिया विद्यापीठातल्या व्हार्टोन बिझनेस स्कूलमध्ये झालेल्या चर्चासत्रात त्या बोलत होत्या. या योजनेचा लाभ ६ कोटी तीस लाख रुग्णांना झाला, ही योजना आता ७५ वर्षांवरल्या सर्वांसाठी उपलब्ध आहे, असं अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

 

भारतात डिजिटल पायाभूत सुविधांची उपलब्धता असून लोकांना या सुविधा सहज उपलब्ध नसत्या तर भारत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था बनू शकली नसती असं सीतारामन यांनी नमूद केलं.