प्रधानमंत्र्यांच्या हस्ते अनेक आयुष उपक्रमांचा प्रारंभ होणार

पारंपरिक औषधशास्त्रावर नवी दिल्लीत सुरू असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या आंतरराष्ट्रीय शिखर परिषदेचा आज समारोप होणार आहे. या समारोप समारंभात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक आयुष उपक्रमांचा प्रारंभ केला जाणार आहे. माय आयुष सर्वसमावेशक सेवा पोर्टल, आयुष मार्क या प्रमाणिकरणाचा यामधे समावेश आहे. या कार्यक्रमात२०२१ ते २०२५ या काळात योग प्रसार आणि विकासामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींना प्रधानमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार दिला जाणार आहे.