आयुर्वेदाचा शास्त्रोक्त पाया, उपयोगिता तसंच संभाव्य क्षमतेचं महत्व आता संपूर्ण जगाला पटू लागलं असल्याचं प्रतिपादन आयुष विभागाचे राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेनं आयोजित केलेल्या शल्यकॉन संमेलनात बोलत होते. आयुष मंत्रालय आयुर्वेदाला तसंच आयुर्वेदिक शल्य तंत्रांना सातत्यानं विकसित करण्यासाठी तसंच त्यांना जागतिक मान्यता मिळवून देण्यासाठी कटिबद्ध असल्याचं ते म्हणाले.
Site Admin | July 14, 2025 8:16 PM | Ayurveda
आयुर्वेदाचं महत्व आता संपूर्ण जगाला पटू लागलं आहे – राज्यमंत्री प्रतापराव जाधव
