भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्लांचं पृथ्वीवर पुनरागमन

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आणि क्सियॉम फोर मोहिमेतले त्यांचे ३ सहकारी आज पृथ्वीवर सुखरुप परतले. अंतराळ स्थानकातून त्यांना घेऊन काल निघालेलं स्पेस एक्सचं ड्रॅगन अंतराळ यान आज कॅलिफोर्नियात सॅन दियागोच्या किनाऱ्याजवळ पॅसिफिक महासागरात कोसळलं. हे अंतराळवीर आता पृथ्वीवरच्या वातावरणाशी जुळवून घेण्याकरता ७ दिवस पुनर्वसन कार्यक्रमात राहतील. १८ दिवसांच्या अंतराळ मुक्कामात शुक्ला यांनी भारतासाठी ७ वेगवेगळे प्रयोग केले आहेत. आकाशगंगा अशा नावाने भारतात ओळखली जाणारी ही मोहीम क्सियॉम स्पेस कंपनी, नासा आणि इसरोचा संयुक्त प्रकल्प होता.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.