भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांचा समावेश असलेलं ॲक्झीओम-4 या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं प्रक्षेपण उद्या होण्याची शक्यता आहे. नासाच्या अधिकृत संकेतस्थळांवरील माहितीनुसार, नासा, ॲक्झीओम स्पेस आणि स्पेसएक्स त्यांच्या या चौथ्या खासगी अंतराळवीर मिशनसाठी आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेनुसार, उद्या दुपारी 12 वाजून 01 मिनिटानं प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या मोहिमेची सुरुवात फ्लोरिडामधील नासाच्या केनेडी स्पेस सेंटरच्या लॉन्च कॉम्प्लेक्स 39Aवर होणार आहे. या मोहिमेला 29 मे रोजी सुरुवात होणार होती. पण अनेक अडथळयांमुळे मोहीम स्थगित झाली. पहिल्यांदा 8 जून, नंतर 10 जून आणि 11 जूनलाही हा प्रक्षेपण कार्यक्रम स्थगित करण्यात आला.
Site Admin | June 24, 2025 10:43 AM | Axiom -4
ॲक्झीओम-4 या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाचं उद्या प्रक्षेपण
