भारतीय अवकाशयात्री ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला आणि ऑक्सिओम-4 मोहिमेतले त्यांचे तीन सहकारी आज अतराळ स्थानकातून परतीच्या प्रवासाला निघाले आहेत. निर्धारित वेळेपेक्षा १५ मिनिटे विलंबानं स्पेस एक्सचं ड्रॅगन अंतराळ यान अंतराळ स्थानकापासून विलग झालं. उद्या दुपारी तीन वाजता हे अंतराळ यान कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्यावर उतरेल.
त्यानंतर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाशी जुळवून घेण्यासाठी शुक्ला इतर सहकाऱ्यांसह फ्लाईट सर्जनच्या देखरेखीखाली सात दिवसांच्या पुनर्वसन कार्यक्रमामध्ये सहभागी होतील.
या मोहिमेअंतर्गत १४ दिवस शुक्ला यांनी आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात मुक्काम केला त्यामध्ये भारतासाठी विशेष सात प्रयोग केले आहेत.