अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेतले शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास १४ जुलैला सुरू होणार

अ‍ॅक्सिओम-४ मोहिमेतील भारतीय अंतराळवीर ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लासह इतर तीन सदस्यांचा परतीचा प्रवास १४ जुलै रोजी सुरू होणार असल्याचं नासानं जाहीर केलं आहे. हे यान पॅसिफिक महासागरात कॅलिफोर्नियाच्या किनाऱ्याजवळ उतरवण्यात येईल. ग्रुप कॅप्टन शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात १४ दिवसांच्या मोहिमेवर आहेत.

 

ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देणारे पहिले तर अवकाशात मोहिमेस जाणारे  दुसरे भारतीय अंतराळवीर ठरले आहेत. ग्रुप कॅप्टन शुक्ला यांनी खास भारतासाठी असे सात वैज्ञानिक प्रयोग केले. अ‍ॅक्सिओम ४ किंवा मिशन ‘आकाश गंगा’ हे भारताच्या गगनयान मानवी अंतराळ उड्डाण मोहिमेसाठीचे पहिले ठोस पाऊल आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.