December 13, 2024 3:28 PM

views 24

चेंगराचेंगरी प्रकरणी तेलुगु अभिनेचा अल्लू अर्जुन याला अटक

पुष्पा २ या चित्रपटाच्या खेळादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी आज तेलुगु अभिनेचा अल्लू अर्जुन याला अटक केली आहे. ४ डिसेंबर रोजी हैदराबाद इथल्या एका चित्रपटगृहात पुष्पा -२ या चित्रपटाच्या प्रिमिअर खेळा दरम्यान चेंगराचेंगरी सदृष स्थिती निर्माण झाली होती. या खेळाच्या वेळी उपस्थित...

December 13, 2024 3:00 PM

views 33

प्रजासत्ताक दिनानिमित्त १० ते १३ डिसेंबरला संरक्षण मंत्रालयाची माय गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्मवर प्रश्नमंजुषा 

प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा एक भाग म्हणून १० ते १३ डिसेंबर दरम्यान संरक्षण मंत्रालयानं माय गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्म वर एक  प्रश्न मंजुषा  आयोजित केली आहे. Quiz on Cultural Heritage and Traditions of India या नावानं माय गव्हर्नमेंट प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन घेतल्या जाणार असलेल्या प्रश्नमंजुषेबाबतचा तपशील  www....

December 13, 2024 2:49 PM

views 28

भाजपाचं प्रदेश अधिवेशन येत्या १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा दिनी शिर्डीत होणार

शिर्डीत भाजपचे प्रदेश अधिवेशन येत्या युवा दिनी अर्थात १२ जानेवारीला होणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांची प्रमुख उपस्थितीत हे प्रदेश अधिवेशन होणार असून या अधिवेशनाला १० हजार भाजप पदाधिकारी, तरूण कार्यकर्त्यांच्या उपस्थिती असणार असल्याची माहिती भाजपचे प्...

December 13, 2024 2:46 PM

views 11

राज्यसभेत अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावरून झालेल्या गदारोळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब

राज्यसभेत आजही अध्यक्ष जगदीप धनखड यांच्यावरच्या अविश्वास ठरावाच्या मुद्द्यावरून विरोधकांनी प्रचंड गदारोळ केला. काँग्रेसप्रणित विरोधी पक्षांनी हा अविश्वास ठराव आणला असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरून आजही खडाजंगी झाली. गेल्या तीस वर्षात आणि आपल्या कार्यकाळात राज्यसभेच्या अध्यक्षांच्याविरोधात अशा...

December 13, 2024 1:44 PM

views 20

छत्तीसगडमध्ये झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार

त्तीसगडमध्ये आज सुरक्षादलांसोबत झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले. बिजापूर जिल्ह्यातल्या बासुगुडा भागात केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या कोब्रा बटालियन आणि जिल्हा राखीव दलाने संयुक्त शोध मोहीम राबवली होती. या मोहिमेदरम्यान नेंद्रा जंगलात चकमक झाली. चकमकीनंतर सुरक्षा दलाने मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठी ज...

December 13, 2024 1:11 PM

views 13

भारतीय रिझर्व्ह बँकेला आज इ-मेलद्वारे बॉम्बची धमकी

भारतीय रिझर्व्ह बँकेला आज इ-मेलद्वारे बॉम्बची धमकी देण्यात आली आहे. रशियन भाषेत लिहिलेली इ-मेल बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर पाठवण्यात आली आहे. या प्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. महिनाभरात ही दुसरी धमकी रिझर्व्ह बँकेला मिळाली आहे.

December 13, 2024 1:09 PM

views 37

तमिळनाडूमधे रुग्णालयात लागलेल्या आगीत एका बालकासह सहा जणांचा मृत्यू, २६ जण जखमी

तमिळनाडूमधील दिंडीगुल इथे एका रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत एका बालकासह सहा जणांचा मृत्यू झाला, तर २६ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये तीन जण अतिदक्षता विभागात असून अन्य रुग्णांवर उपचार करून सोडून देण्यात आले. रुग्णालयाच्या तळ मजल्यावर लागलेली ही आग शार्ट सर्किटमुळे लागल्याचे समजते. तमिळनाडूचे म...

December 13, 2024 2:48 PM

views 22

संसद हल्ल्यातल्या शहिदांना आज संसदेच्या दोन्ही सभागृहात आदरांजली

संसद हल्ल्यातल्या शहिदांना आज संसदेच्या दोन्ही सभागृहात आदरांजली वाहण्यात आली. दोन्ही सदनात मौन पाळून शहिदांना अभिवादन करण्यात आलं. शहिदांचं साहस आणि समर्पण वृत्तीला देश कधीच विसरू शकणार नाही असं लोकसभेचं सभापती ओम बिर्ला यांनी सांगितलं. दहशतवादाचा मुकाबला करण्याच्या देशाच्या अढळ संकल्पाचा त्यांनी प...

December 13, 2024 3:21 PM

views 29

महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ७ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांचं भूमिपूजन आणि लोकार्पण

प्रयागराजच्या भूमीवर एक इतिहास रचला जात असून महाकुंभ मेळ्याच्या  आयोजनामुळे  देशाची  सांस्कृतिक आणि आध्यात्मिक ओळख एका नव्या उंचीवर पोहोचेल, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.    प्रयागराजमध्ये पुढच्या वर्षी होणार असलेल्या महाकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ७ हजार कोटी रु...

December 13, 2024 12:12 PM

views 50

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी तोषखाना प्रकरणात दोषी

पाकिस्तानच्या एका न्यायालयाने पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना तोषखाना प्रकरणात दोषी ठरवलं आहे. सौदी राजघराण्याने मे 2021 च्या भेटीमध्ये काही मौल्यवान वस्तू भेट म्हणून दिल्या होत्या त्या वस्तू सरकारी तोषखान्यात जमा करण्याऐवजी इम्रान खान यांनी स्वतःकडे ठेवल्...