December 24, 2025 12:57 PM December 24, 2025 12:57 PM

views 98

आज ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’

ग्राहकांचे हक्क आणि संरक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी देशभरात आज राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जात आहे. वर्ष १९८६ मध्ये आजच्याच दिवशी ग्राहक संरक्षण कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली होती. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून  हा दिवस ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो.

December 24, 2025 12:46 PM December 24, 2025 12:46 PM

views 55

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुरूपसिंग नाईक यांचं आज नंदुरबार जिल्ह्यामधल्या नवापूर इथं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर नवापूर इथल्या रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली.   सुकवेल गट ग्रामपंचायतीच्या सरंपचपदापासून ...

December 24, 2025 2:54 PM December 24, 2025 2:54 PM

views 28

इसरोकडून अमेरिकन दळणवळण उपग्रह ब्लु बर्ड ब्लॉक २ चं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरो ने आज अमेरिकन दळणवळण उपग्रह ब्लु बर्ड ब्लॉक २ चं यशस्वी प्रक्षेपण केलं. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ स्थानकावरून भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं.    अमेरिकी ब्ल्यूबर्ड उपग्रह हा भारतीय अंतराळ...

December 24, 2025 2:57 PM December 24, 2025 2:57 PM

views 26

अमेरिकेच्या H1-B व्हिजासाठीच्या निवड प्रक्रियेत बदल

अमेरिकेच्या एच वन बी व्हिजा साठीच्या निवड प्रक्रियेत अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने मोठे बदल केले आहेत.  त्यानुसार यापुढे एच वन बी व्हिजा साठी लॉटरी व्यवस्था बंद करून त्याऐवजी अधिक उच्चशिक्षित आणि जास्त पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. यामुळे अमेरिकन कर्मचाऱ्यांना अधिक चांगलं वे...

December 23, 2025 8:55 PM December 23, 2025 8:55 PM

views 54

राष्ट्रपतींच्या हस्ते डॉ. जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान

जगविख्यात खगोलशास्त्रज्ञ दिवंगत डॉ. जयंत नारळीकर यांना आज मरणोत्तर विज्ञानरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती भवन इथं झालेल्या या सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आयुकाचे संचालक आर. श्रीयानंद यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याशिवाय देशभरातल्या एकूण ८ शास्त्रज्ञांना विज्ञान श्री...

December 23, 2025 8:54 PM December 23, 2025 8:54 PM

views 12

महापालिका निवडणुकांसाठी ठाकरे बंधू आणि पवार कुटुंब एकत्र येण्याच्या तयारीत

पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार यांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्रितरित्या निवडणूक लढवू शकतात, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना दिली.   येत्या शुक्रवारपर्यंत या आघाडीची घोषणा हो...

December 23, 2025 8:56 PM December 23, 2025 8:56 PM

views 11

प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विनोदकुमार शुक्ल यांचं निधन

प्रसिद्ध हिंदी साहित्यिक आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विनोदकुमार शुक्ल यांचं आज छत्तीसगडमध्ये रायपूर इथं निधन झालं. ते ८९ वर्षांचे होते. दिवार में एक खिडकी रहती थी, नौकर की कमीज, खिलेगा तो देखेंगे, एक छुपी जगह या त्यांच्या कादंबऱ्या खूप गाजल्या. त्यातल्या नौकर की कमीजवर चित्रपटही निघाला होता. गेल्या...

December 23, 2025 1:28 PM December 23, 2025 1:28 PM

views 47

विकसित भारत जी रामजी योजनेसाठी १ लाख ५१ हजार कोटी रुपये तरतूद

विकसित भारत जी रामजी योजनेसाठी १ लाख ५१ हजार कोटी रुपये तरतूद केली असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी आज दिली. चौहान यांनी एका व्हिडिओ संदेशात सांगितलंय की, आता १०० दिवसांऐवजी सव्वाशे दिवसांच्या रोजगाराची हमी ग्रामीण भागत सरकारने दिली आहे. मनरेगा या पूर्वीच्या योजनेच्या नावाख...

December 23, 2025 10:21 AM December 23, 2025 10:21 AM

views 56

महापालिका निवडणुकांसाठी अर्ज भरायला सुरूवात

राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीचे उमेदवारी अर्ज भरायची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे. ३० डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार असून अर्जांची छाननी ३१ डिसेंबर रोजी होईल. २ जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. निवडणूक चिन्हांचं वाटप आणि अंतिम उमेदवारांची यादी ३ जानेवारी रोजी प्रसिद्...

December 23, 2025 10:22 AM December 23, 2025 10:22 AM

views 38

देशभरात ५ कोटी ८० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी

देशात यावर्षी आतापर्यंत ५ कोटी ८० लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधी झालेल्या पेरण्याच्या तुलनेत ही संख्या सुमारे आठ लाख हेक्टरने अधिक आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं १९ डिसेंबरपर्यंतच्या रब्बी पिकांखालील क्षेत्राच्या प्रगतीचा अहवाल प्रसि...