December 18, 2025 7:01 PM

views 93

शिल्पकार राम सुतार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामाने अंत्यसंस्कार

ख्यातनाम  शिल्पकार महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्या पार्थिवावर आज  नोएडा इथल्या वैकुंठ स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले तसंच राज्य शासनाच्या वतीनं  राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.अंत्यसं...

December 17, 2025 8:27 PM

views 96

म्युच्युअल फंडाच्या नियमावलीत सुधारणा

म्युच्युअल फंडाच्या नियमावलीत सुधारणा आणि देखभाल शुल्क, मध्यस्थ शुल्कावर मर्यादा आणणाऱ्या सुधारणा सेबीनं आज जाहीर केल्या. नव्या आर्थिक वर्षापासून हे नियम लागू होतील. याशिवाय शेअर ब्रोकरच्या नियमावलीत सुधारणाही सेबीच्या संचालक मंडळानं मंजूर केल्याचं सेबीचे अध्यक्ष तुहीन कांत पांडे यांनी आज जाहीर केलं...

December 17, 2025 8:59 PM

views 109

खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना एनपीएसमधून ८० टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येणार

गैरसरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना आता निवृत्तीनंतर एनपीएसमधून ६० ऐवजी ८० टक्क्यांपर्यंतची रक्कम काढून घेता येईल. उर्वरित २० टक्के रक्कम ॲन्युईटी योजनेत गुंतवावी लागेल. यासंदर्भातले नियम पीएफआरडीए अर्थात पेन्शन फंड नियामक आणि विकास प्राधिकरणानं जारी केले आहेत. एनपीएस खात्यात जमा असलेली ...

December 17, 2025 8:16 PM

views 11

विमा क्षेत्रातली थेट परकीय गुंतवणूक वाढवणाऱ्या विधेयकाला संसदेची मंजुरी

विमा क्षेत्रात थेट परदेशी गुंतवणूक सध्याच्या ७४ टक्क्यावरून १०० टक्क्यावर नेणारं, सबका बिमा, सबकी रक्षा विधेयक राज्यसभेनं आज संमत केलं. या विधेयकात विरोधकांनी सुचवलेल्या अनेक सुधारणा सभागृहानं नामंजूर केल्या. या विधेयकामुळे परदेशी कंपन्यांना विमा क्षेत्रात अधिकाधिक भांडवल आणता येईल, तसंच अधिकाधिक ना...

December 17, 2025 8:15 PM

views 16

ओमानमधे संरक्षण आणि धोरणात्मक भागिदारी बळकट करण्यावर चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज ओमानमधे मस्कत इथं पोचले. विमानतळावर ओमानचे उपप्रधानमंत्री सय्यद शिहाब बिन तारिक अल सईद यांनी त्यांचं स्वागत केलं. प्रधानमंत्री मोदी आणि ओमाने उपप्रधानमंत्री सईद यांच्यात सध्या चर्चा सुरू आहे. भारत आणि ओमान यांच्यातलं संरक्षण क्षेत्रातलं सहकार्य बळकट करणं आणि धोरणात्मक भा...

December 17, 2025 8:01 PM

views 16

निरस्तिकरण आणि दुरुस्ती विधेयक राज्यसभेत मंजूर

निरस्तिकरण आणि दुरुस्ती विधेयक २०२५ आज राज्यसभेत चर्चेनंतर मंजूर झालं. लोकसभेनं हे विधेयक कालच मंजूर केलं होतं. एकंदर ७१ कायदे रद्द करण्याची आणि ४ कायद्यांमध्ये सुधारणा करायची तरतूद या विधेयकात आहे.  राज्यसभेत सध्या सबका वीमा सबकी रक्षा या विधेयकावर चर्चा सुरू आहे.  आर्थिक सायबर घोटाळे अहवाल आणि व्य...

December 17, 2025 7:59 PM

views 19

अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती विधेयक लोकसभेत मंजूर

अणुऊर्जेचा शाश्वत वापर आणि प्रगती विधेयक आज लोकसभेत मंजूर झालं. या क्षेत्रात सुरक्षा, दर्जा आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठीच्या यंत्रणा बळकट करण्याचं काम हे विधेयक करेल, असा विश्वास अणुऊर्जा राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी विधेयकावरच्या चर्चेला उत्तर देताना व्यक्त केला. या क्षेत्रातल्...

December 17, 2025 7:57 PM

views 26

नगरपरिषदा, नगरपंचायतीसाठी शनिवारी मतदान, रविवारी मतमोजणी

नगरपरिषदा आणि नगरपंचायतीसाठी शनिवारी मतदान होत आहे आणि रविवारी मतमोजणी होणार आहे. मतदानाच्या तसंच मोजणीच्या दिवशी अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी वेळीच उपाय योजना कराव्यात आणि अशा घटना घडल्या तर त्वरित कठोर कारवाई करावी, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत.  नगरपरिषदा आणि न...

December 17, 2025 7:46 PM

views 45

दिल्लीत हवेच्या ढासळलेल्या गुणवत्तेची गंभीर दखल घेत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हवेच्या ढासळलेल्या गुणवत्तेची गंभीर दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयानं आज अनेक निर्देश दिले. शहरातली प्रचंड वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी दिल्लीच्या सीमेवर असलेले ९ पथकर नाके तात्पुरते बंद करण्याचा किंवा दुसरीकडे हलवण्याचा तत्काळ विचार करावा, अशी सूचना सरन्यायाधीश न्यायमू...