December 26, 2025 5:34 PM December 26, 2025 5:34 PM

views 5

कबुतरांना खाऊ घातल्याप्रकरणी व्यावसायिक दोषी

     कबुतरांना सार्वजनिक ठिकाणी खाऊ घातल्याप्रकरणी  मुंबईतल्या दंडाधिकारी न्यायालयानं एका व्यावसायिकाला दोषी ठरवलं आहे. त्याला ५ हजार रुपये दंड भरण्याचे निर्देशही  न्यायालयानं  दिले आहेत. कबुतरांना अशा प्रकारे खाऊ घातल्यामुळं संसर्ग पसरू शकतो. त्यामुळं मुंबई महानगर पालिकेनं कबुतरांना खाऊ घालण्यावर ब...

December 26, 2025 3:32 PM December 26, 2025 3:32 PM

views 4

कंत्राटदारांच्या अनामत ठेवींचा घोटाळा करणाऱ्या दोन आरोपींना कोठडी

पालघर जिल्ह्यातल्या जव्हार सार्वजनिक विभागातल्या  कंत्राटदारांच्या अनामत ठेवींचा घोटाळा करणाऱ्या दोन मुख्य आरोपींना जव्हार दंडाधिकारी न्यायालयानं २९ डिसेंबर पर्यंत  पुन्हा पोलीस कोठडीत रवाना केलं आहे.    बनावट स्वाक्षऱ्या असलेल्या धनादेशाच्या आधारे सरकारी खात्यातून १११ कोटी ६३ लाख रुपये काढण्या...

December 26, 2025 3:24 PM December 26, 2025 3:24 PM

views 21

प्रधानमंत्र्यांनी राष्ट्रीय बाल पुरस्काराच्या २० विजेत्यांशी संवाद साधला

संपूर्ण देश आज साहेबजादा बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या अतुलनीय शौर्य आणि त्यागाचं स्मरण करत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत वीर बाल दिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.   यावेळी त्यांनी राष्ट्रीय बाल पुरस्काराच्या २० विजेत्यांशी संव...

December 26, 2025 3:26 PM December 26, 2025 3:26 PM

views 5

पी व्ही सिंधूची बॅडमिंटन जागतिक महासंघ अॅथलीट्स आयोगाच्या अध्यक्षपदी निवड

दोन वेळा ऑलिंम्पिक पदक विजेती भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची २०२६ ते २९ या कालावधीसाठी बॅडमिंटन जागतिक महासंघ अॅथलीट्स आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या भूमिकेत, सिंधू जागतिक बॅडमिंटनच्या धोरणांमध्ये आणि प्रशासनात बॅडमिंटनपटूंचा आवाज बळकट करण्यासाठी काम करेल.

December 26, 2025 3:05 PM December 26, 2025 3:05 PM

views 3

थोर स्वातंत्र्यसेनानी शहीद उधम सिंह यांच्या १२६व्या जयंतिनिमित्त आदरांजली

थोर स्वातंत्र्यसेनानी शहीद उधम सिंह यांच्या १२६व्या जयंतिनिमित्त आज देश त्यांचं स्मरण करत आहे. फाळणीपूर्व भारतातल्या पंजाबमध्ये सुनाम या गावात १८९९मध्ये सिंह यांचा जन्म झाला होता. जालियनवाला बागेत जमलेल्या देशबांधवांवर गोळ्या झाडण्याचे आदेश देणाऱ्या मायकल ओडवायर या ब्रिटीश अधिकाऱ्याची त्यांनी हत्या ...

December 26, 2025 2:59 PM December 26, 2025 2:59 PM

views 5

उत्तर कोरियामधे नवीन दारूगोळा आणि शस्त्रास्त्र कारखाने उभारण्याची योजना जाहीर

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांनी देशाच्या लष्करी क्षमतेत मोठी वाढ करण्यासाठी नवीन दारूगोळा आणि शस्त्रास्त्र कारखाने उभारण्याची योजना जाहीर केली आहे. काल किम जोंग-उन यांनी ८ हजार ७०० टनांच्या अण्वस्त्र सज्ज,  क्षेपणास्त्र पाणबुडीची पाहणी केली होती.   पुढील वर्षाच्या सुरुवातीला उत्तर कोरियाम...

December 26, 2025 2:57 PM December 26, 2025 2:57 PM

views 11

 दिल्लीतील एअर प्युरिफायरवरचा जीएसटी कमी करण्याची याचिका

   दिल्लीत हवेचा दर्जा  ढासळत असल्यामुळे  एअर प्युरिफायरवरचा जीएसटी कमी करावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयानं  केंद्र सरकारकडून जबाब मागितला आहे. एअर प्युरिफायरवर सध्या १८ टक्के जीएसटी आकारला जातो. मात्र हे उपकरण गरजेचं झालं असून,  वैद्यकीय उपकरण गणलं जावं आणि त्यावरचा जीएसटी पाच...

December 26, 2025 2:53 PM December 26, 2025 2:53 PM

views 4

भारत जी राम जी योजनेअंतर्गत विकासकामं राबवण्यात येणार – कृषीमंत्री

२०४७ पर्यंत विकसित भारताचं स्वप्न साकार करण्याच्या दृष्टीनं विकसित भारत जी राम जी योजनेअंतर्गत विकासकामं राबवण्यात येतील असं केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंग चौहान यांनी सांगितलं आहे.   दूरदर्शनच्या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी संगितलं की जीरामजी योजनेत सव्वाशे दिवस काम पुरवण्याची तरतू...

December 26, 2025 1:37 PM December 26, 2025 1:37 PM

views 7

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा टी-20 सामना आज तिरूवनंतपुरममध्ये

महिला क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा टी-ट्वेंटी सामना आज तिरूवनंतपुरम इथं होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरूवात होईल. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला संघ दोन – शून्यने आघाडीवर आहे.

December 26, 2025 1:30 PM December 26, 2025 1:30 PM

views 49

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरण

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यानी आज नवी दिल्ली इथं 'वीर बाल दिना'निमित्त प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारांचे वितरण केलं. या वर्षी १८ राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांतल्या मिळून २० मुलांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात राष्ट्रपती म्हणाल्या, पुरस्कार विज...