January 2, 2026 7:41 PM

views 123

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बंधूचा वचननामा

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीनं आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी आज दादर इथं शिवसेना भवनात मुंबईतल्या उमेदवारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईकरांसाठी विविध योजना आणि प्रकल्पांच्या घोषणा केल्या. यामध्ये घरका...

January 2, 2026 3:43 PM

views 15

धान खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीला येत्या ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ

पणन हंगाम २०२५–२६ अंतर्गत किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत धान आणि भरडधान्य खरेदीसाठी शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणीला येत्या ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.   अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागानं ही माहिती दिली. यापूर्वी शेतकरी नोंदणीची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२५ होती.

January 2, 2026 3:37 PM

views 39

डॉ. टेस्सी थॉमस आणि डॉ. गगनदीप कांग यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

मराठी विज्ञान परिषदेतर्फे दिले जाणारे जीवन गौरव पुरस्कार आज जाहीर झाले. त्यात डॉ. अनिल काकोडकर जीवनगौरव पुरस्कारासाठी क्षेपणास्त्र क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या डॉ. टेस्सी थॉमस यांची,  तर डॉ. रा. वि. साठे जीवनगौरव पुरस्कारासाठी लस संशोधन कार्यात अग्रेसर असणाऱ्या डॉ. गगनदीप कांग यांची निवड झाल...

January 2, 2026 3:28 PM

views 26

महाराष्ट्रासह ८ राज्यात सेमीकंडक्टर प्रकल्पाचे २२ प्रस्ताव मंजूर

इलेक्ट्रॉनिक्स भाग उत्पादन योजनेच्या तिसऱ्या टप्प्यात केंद्र सरकारने  २२ नवीन प्रस्ताव  मंजूर केले असून नवीन वर्षात देशामध्ये ४ नवे सेमिकंडक्टर उत्पादन प्रकल्प सुरु होत असल्याची घोषणा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज केली. यासंबंधात नवी दिल्लीत आयोजित केलेल्या एका ...

January 2, 2026 7:02 PM

views 72

महानगरपालिका निवडणुकीसाठी माघारीची मुदत समाप्त

महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागं घेण्याची मुदत आज संपली. आता ठिकठिकाणच्या लढतींचं चित्र स्पष्ट होईल. अनेक ठिकाणी  उमेदवारांना प्रतिस्पर्धी न उरल्यानं त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. अनेक ठिकाणी मुळातच एकमेव अर्ज आले होते, तर काही ठिकाणी छाननीत इतर अर्ज बाद झाल्यानं उमेदव...

January 2, 2026 7:37 PM

views 3.5K

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं साताऱ्यात औपचारिक उद्घाटन

मराठी भाषा आणि जाती धर्म यांची सरमिसळ न करण्याचं आवाहन संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांनी आज केलं. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या औपचारिक उद्घाटनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.    सातारा येथील शाहू स्टेडियममध्ये ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं आज उद्घाटन झालं. संमेलनाच्या अ...

January 2, 2026 3:17 PM

views 25

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसाठीच्या महाराष्ट्रातल्या दुसऱ्या बोगद्याचा  ब्रेकथ्रू संपन्न

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन च्या माध्यमातून मध्यमवर्गीयांना  परवडणाऱ्या दरात प्रवास करण्याची सुविधा मिळेल असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे. बुलेट ट्रेनसाठीच्या महाराष्ट्रातल्या दुसऱ्या बोगद्याच्या पालघर जिल्ह्यातल्या  ब्रेकथ्रू समारंभाला ते आज दूरस्थ पद्धतीने उपस्थित होते.   हा  ...

January 2, 2026 3:09 PM

views 12

इंदूरमधे दूषित पाण्यामुळे अतिसार होऊन १० जणांचा मृत्यू

इंदूरमधल्या भगीरथपुरा इथं दूषित पाण्यामुळे अतिसार होऊन १० जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे, असं इंदूरचे महापौर पुष्यमित्र भार्गव यांनी आज सांगितलं. या भागातल्या पेयजलाचे नमुने अधिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.     नळाला लागलेल्या गळतीमुळे पेयजल ...

January 2, 2026 3:07 PM

views 11

व्यावसायिक वापरासाठीच्या एल पीजी सिलिंडर्सच्या किमतींमध्ये १११ रुपयांची वाढ

घरगुती ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या गॅसच्या दारात कोणतेही बदल झाले नसल्याचं तेल आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. व्यावसायिक वापरासाठीच्या एल पीजी सिलिंडर्सच्या किमतींमध्ये एकशे अकरा रुपयांची  वाढ झाली आहे, त्यामुळे घरगुती ग्राहकांनाही वाढीव किंमत द्यावी लागणार, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्य...

January 2, 2026 3:02 PM

views 5

११व्या भारत आंतरराष्ट्रीय युवक नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेची ४ जानेवारी पासून सुरुवात होणार

चेन्नई बंदरात होणाऱ्या ११व्या भारत आंतरराष्ट्रीय युवक नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेचं काल उदघाटन झालं. या स्पर्धेला ४ जानेवारीपासून सुरुवात होणार असून त्यासाठी १३ देशांमधून ११७ स्पर्धकांनी नोंदणी केली आहे. स्पर्धेच्या अधिकृत यु ट्यूब वाहिनीवर सर्व शर्यतींच थेट प्रक्षेपण  पाहता येईल.